

Narendra Mehta Action on Rent Garba Partner
ESakal
मीरा-भाईंदर : सध्या सोशल मीडियावर 'नवरात्री उत्सवानिमित्त' (Navratri 2026) गरबा पार्टनर भाड्याने मिळणार अशा प्रकारच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. या प्रकारामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली असून या जाहिरातींमागे नेमके कोण आहे? याचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी सायबर क्राईमअलर्ट मोडवर आले असून भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.