Satej Patil on Gokul Dudh Sangh : गोकुळमधील शासननियुक्त संचालकांच्या निर्णयावर सतेज पाटील याची पहिलीच प्रतिक्रिया; ‘निवडणुकांना अर्थच राहणार नाही’

Gokul Voting Rights : गोकुळ दूध संघावर चार शासननियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याच्या निर्णयावर आमदार सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘असे झाले तर निवडणुकांना अर्थच राहणार नाही,’ असे म्हणत त्यांनी सरकारच्या निर्णयावर आक्षेप घेतला.
Satej Patil on Gokul Dudh Sangh

Satej Patil on Gokul Dudh Sangh

esakal

Updated on: 

Gokul Dudh Government Nominated Directors : गोकुळ दूध संघासारख्या सहकारी संस्थांवर शासननियुक्त संचालक नेमण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयावर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘हा दुर्दैवी निर्णय आहे. जनतेने दिलेला कौल मान्य करायचा नाही आणि आपल्याला पाहिजे तसे निर्णय घ्यायचे, असे धोरण असेल तर निवडणुकांना अर्थच राहणार नाही. त्यापेक्षा सर्व निवडणुका रद्द करा. शासनाच्या वतीने माणसे नेमा आणि त्यांनीच साखर कारखाने, सूतगिरण्या, महानगरपालिका चालवाव्यात,’ अशा शब्दांत पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

Loading content, please wait...

Related Stories

Gokul Milk Union election controversy Kolhapur
Satej Patil statement on Gokul chairman election
Chief Minister Banner Satej Patil Gokul Milk Union Election Result
satej patil eknath shinde devendra fadanvis satej patil prakash abitkar hasan mushrif dhananjay mahadik Kolhapur Gokul Election Result