
Kolhapur Gokul Milk : ‘गोकुळ’मध्ये अध्यक्ष महायुतीचा की महाविकास आघाडीचा हा मुद्दा मावळते अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी चांगलाच चर्चेत आणला. त्यामुळे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘महायुती म्हणून एकत्रित राहा, गोकुळला पुढे न्या’ असा सल्ला दिला. दुपारी बाराच्या सुमारास मुंबईतील ‘वर्षा’ बंगल्यावर संचालकांनी भेट घेतली. दुपारी तीनच्या सुमारास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. तेथे त्यांना मागण्यांची माहिती दिली.