कोल्हापूर : गाय व म्हैस दूध खरेदी दरात वाढ (Gokul Milk Rate Hike) केल्यानंतर आता कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाने (गोकुळ) गाय व म्हैशीच्या दूध दरात प्रतिलिटर दोन रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून (ता. ५) नवे दर लागू होणार असून, त्यामुळे कोल्हापूरसह पुणे, मुंबईच्या ग्राहकांना जादा दराने दूध खरेदी करावी लागणार आहे.