

Gokul Milk Price Hike
esakal
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळच्या संचालक बैठकीत दूध दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. गायी आणि म्हशीच्या दूध खरेदी आणि विक्री दरात वाढ करण्यात आलीय. म्हशीच्या दूध खरेदी दरात ३ रुपयांची तर गायीच्या दूध खरेदी दरात २ रुपयांची वाढ केलीय. दुसरीकडे म्हशीच्या दूध विक्री दरात ६ रुपयांची आणि गायीच्या दूध विक्री दरात ४ रुपयांची वाढ केलीय.