
कोल्हापूर : दूध हाताळणीसाठी नवीन यंत्रणा व मशीनमुळे नव्या ठेकेदाराकडून याची हाताळणी वेळेत झाली नसल्याने जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) दूध संघाच्या मुंबई येथील एक दिवसाची दूध विक्री सुमारे ६० हजार लिटरने घटली होती. त्यामुळे ‘गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे यांना तातडीने मुंबईला जावे लागल्याचे समजते. चर्चेनंतर ही पुन्हा दूध विक्री पूर्ववत केली आहे. दरम्यान, नवीन ठेकेदाराचा ठेका रद्द करून जुन्या ठेकेदाराला हा ठेका दिला आहे.