

Satej Patil Gokul Election Vishwas Patil abaji statement
esakal
Gokul Election Voting : कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात आणि अर्थकारणात महत्त्वाचे स्थान असलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज (रविवार) मतदानाला सुरुवात झाली आहे. मागील सहा महिन्यांपासून आरोप-प्रत्यारोप, राजकीय डावपेच आणि मतांची जुळवाजुळव यामुळे गोकुळच्या निवडणुकीला चांगलीच रंगत आली आहे. या पार्श्वभूमीवर गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष आणि तीन दशकांहून अधिक काळ संचालक म्हणून काम केलेले विश्वास पाटील ऊर्फ आबाजी यांनी मतदानाचा हक्क बजावला. यानंतर त्यांनी महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त करत सर्व उमेदवार १५०० हून अधिक मतांच्या फरकाने निवडून येतील, असा दावा केला.