Gokul Milk Union Election 2026 : गोकुळच्या मतदान केंद्रावर सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा; मतपत्रीकेचे फोटो व्हायरल, नजर चुकवून मोबाईलवर काढले फोटो

Ballot Paper Photos Viral : गोकुळ दूध संघ निवडणुकीदरम्यान मतदान केंद्रावरील मतपत्रिकांचे फोटो व्हायरल झाले आहेत. नजर चुकवून मोबाईलवर फोटो काढल्याचा प्रकार समोर आल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
Gokul Milk Union Election 2026 Ballot Paper Photos Viral

Gokul Milk Union Election 2026 Ballot Paper Photos Viral

esakal

Updated on: 

Gokul Election Controversy : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीसाठी रविवारी (ता. १८) चुरशीने मतदान पार पडले. काही मतदान केंद्रांवर मतदारांचा उत्साह आणि राजकीय चुरस दिसून आली, तर काही ठिकाणी शांततेत मतदान झाले. मात्र, या निवडणुकीत मतदानाच्या आकड्यांबरोबरच मतदान केंद्रातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास बंदी असतानाही काही ठरावधारकांनी नजर चुकवून मोबाईल नेले. मतदान केल्यानंतर छायाचित्रे काढून ती समाजमाध्यमांवर प्रसारित केल्याचे प्रकार समोर आले आहेत. यामुळे मतदानाची गोपनीयता राखण्यासाठी केलेल्या व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com