

Gokul Election Voting Percentage Satej Patil vs Hasan Mushrif
esakal
Satej Patil vs Hasan Mushrif : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ) संचालक मंडळाच्या सन २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज अत्यंत चुरशीच्या वातावरणात तब्बल ९९.९६ टक्के विक्रमी मतदान पार पडले. अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या निवडणुकीत दोन्ही बाजूंकडून आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडल्या होत्या; मात्र प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी कुठेही अनुचित प्रकार न घडता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.