

Voters Prepare to Cast Ballots in the Kolhapur Gokul Milk Union Election
esakal
कोल्हापूर: जिल्हा दूध संघा (गोकुळ) साठी उद्या (ता. १८) मतदान होणार आहे. त्यामुळे मंत्री, आमदार, खासदार, माजी आमदार-खासदार यांच्या इच्छा-आकांक्षा उद्या मतपेटीत बंद होणार आहेत. थेट लढतीत २५ जागांसाठी ५० उमेदवार रिगंणात आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील विविध ३५ केंद्रांवर सकाळी आठ ते सायंकाळी पाच दरम्यान पाच हजार ४१८ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. सुमारे दीडशे पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. मतमोजणी सोमवारी (ता.१९) होणार आहे. दरम्यान, दिवसभरात रमणमळा येथील बहुउद्देशीय सभागृहातून सर्व केंद्रांवरील अधिकारी-कर्मचाऱ्यांना साहित्यासह रवाना करण्यात आले.