

Tensions Rise at Gokul Milk Union as Dairy Societies Demand Withdrawal of Notices
sakal
कोल्हापूर: ‘गोकुळ’चे प्रशासकीय अध्यक्ष प्रदीप मालगावे यांना सिंधुदुर्गनंतर कोल्हापूरचे जिल्हा उपनिबंधक होण्याचे बक्षीस मिळवायचे आहे. यासाठी त्यांनी राजकीय वरहस्तांकडून जिल्ह्यातील ४१० दूध संस्था अपात्र ठरवून गोकुळ मोडून काढण्याची सुपारी घेतली आहे. अमूल दूध संघ वाढवण्यासाठी गोकुळ मोडून काढणार आहात काय? मालगावे यांनी दूध संस्था अपात्र ठरवण्यासाठी दिलेल्या नोटीस तत्काळ मागे घेतल्या नाही तर गुरा-ढोरांसह मालगावे यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा गोकुळ संलग्न ४१० दूध संस्थांच्या प्रतिनिधींनी आज दिला.