Gokul Milk Politics : गोकुळमध्ये पडद्यामागे राजकीय घडामोडी; अध्यक्ष निवडीआधी संचालकांना घरातून उचललं; सतेज पाटलांचे १३ संचालक सहलीवर, महायुतीचे संचालक गोव्याला जाणार?

Gokul Chairman Election : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीआधी कोल्हापुरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. समविचारी आघाडीचे १३ संचालक सहलीवर गेले असून महायुतीचे संचालकही गोव्याला रवाना झाले आहेत.
Gokul Milk Politics Chairman Election satej patil hasan mushrif

Gokul Milk Politics Chairman Election satej patil hasan mushrif

esakal

Updated on: 

Gokul President Election : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीची तारीख जवळ येत असताना जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. अध्यक्ष निवडीच्या सभेतील कोरमचा पेच आणि ऐनवेळी कोणताही दगाफटका होऊ नये, यासाठी दोन्ही आघाड्यांनी आपल्या नवनिर्वाचित संचालकांना सहलीवर पाठवण्याची रणनीती आखली आहे. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली समविचारी आघाडीचे १३ संचालक शुक्रवारी कर्नाटकातील आप्पाचीवाडी येथे हलसिद्धनाथाचे दर्शन घेऊन सहलीवर रवाना झाले. तर महायुतीचे १२ संचालक रविवारी गोव्याला जाणार आहेत. त्यामुळे २९ ऑक्टोबरला होणाऱ्या अध्यक्ष निवडीपूर्वी दोन्ही बाजूंनी आपापले संचालक एकत्र ठेवण्यावर भर दिला जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Kolhapur Gokul chairman election latest news
Gokul Chairman Election Satej Patil
Gokul election result 2026 in Kolhapur
Satej Patil's Promise May Decide Gokul's First Chairmanship
Marathi News Esakal
www.esakal.com