

Satej Patil statement mahadevrao mahadik and dhananjay mahadik
esakal
Mahadik family politics : गोकुळवर महादेवराव महाडिक यांची सत्ता असताना मुख्यमंत्र्यांकडून कधीही राजकीय हस्तक्षेप झाला नाही, असे मी माध्यमांशी बोललो याचा अर्थ महाडिक यांचा कारभार चोख होता किंवा त्यांच्या कारभाराला माझ्याकडून ना-हरकत प्रमाणपत्र दिले, असे अजिबात समजू नका. गोकुळला मल्टिस्टेट करून जिल्ह्यातील दूध संस्थांचे महत्त्व कमी करणे, महाडिकांच्या मालकीचे टँकर, पॅकिंगचा ठेका यासह अनेक कारनाम्यांच्या भ्रष्टाचारी कारभाराला कंटाळूनच गेल्या निवडणुकीत दूध उत्पादकांनी सत्तांतर केले होते. महाडिक कधी स्वतः संस्था काढत नाहीत, तर दुसऱ्यांनी काढलेल्या संस्था बळकवतात, हा इतिहास महाराष्ट्राला माहीत असल्याचा टोला आमदार सतेज पाटील यांनी खासदार धनंजय महाडिक यांना लगावला.