

Gokul Politics Comes Full Circle: Familiar Leaders, Changed Opposition
sakal
-निवास चौगले
कोल्हापूर: जिल्ह्याचे प्रमुख आर्थिक सत्ताकेंद्र असलेल्या ‘गोकुळ’च्या निवडणुकीत चेहरे तेच आहेत फक्त त्यांचे विरोधक बदलले आहेत. पाच वर्षांपूर्वी माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या विरोधात सर्वजण एकवटले होते. आज तेच सर्वजण काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्याविरोधात एकत्र आले आहेत. यानिमित्ताने इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे. यातून राजकारणात कोणीही कायमचा शत्रू किंवा मित्र असत नाही, याची प्रचिती येत आहे. ‘गोकुळ’मध्ये सलग तीस वर्षांहून अधिक काळ माजी आमदार महादेवराव महाडिक, कै. पी. एन. पाटील व माजी अध्यक्ष अरुण नरके यांच्या नेतृत्वाखालील सत्ता होती.