कोल्हापूर : चंदगड येथील शासकीय विश्रामगृहात रविवारी झालेल्या घडामोडीनंतर सोमवारीच राजीनामा देऊन कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)चे अध्यक्ष अरुण डोंगळे (Arun Dongle) मुंबईला रवाना झाले होते. दरम्यान, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी बोर्ड सचिव पी. बी. पाटील यांच्या मान्यतेसह गुरुवारी (ता. २२) संचालक मंडळाची तातडीची बैठक असल्याची पत्रेही संचालकांना पाठविली. आज त्याची पोहोच जमा झाली. त्यामुळे मुंबईत होणाऱ्या बहुतांशी घडामोडी कोल्हापुरातच झाल्याचे स्पष्ट झाले.