
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाने म्हैस दूध खरेदी दरात दोन रुपयांनी वाढ केली आहे. ६.५ फॅट व ९.० एस.एन.एफ. प्रतिच्या पुढील दुधास प्रतिलिटर दोन रुपये दूध खरेदी दरामध्ये वाढ केली आहे. त्यामुळे प्रतिलिटर ५२.८० रुपये दरावरून तो ५४.८० रुपये केला आहे. तसेच ७.० फॅट व ९.० एस.एन.एफ करिता प्रतिलिटर ५५.५० रुपये वरून ५७.५० रुपये करण्यात आल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.