

सराफ व्यावसायिकांच्या मते, अमेरिकन बाजारातील हालचालीमुळे दरवाढीचा परिणाम भारतातही जाणवतो आहे.
esakal
Gold Silver Rate : सोने आणि चांदीचे दर कमी होतील, असे वाटत असताना आज पुन्हा त्यांच्या दरामध्ये वाढ झाली. कोल्हापुरातील सराफ बाजारात सोन्याचा दर प्रतितोळा एक लाख २६ हजार ९०० रुपयांवर, तर चांदीचा प्रतिकिलो दर एक लाख ५६ हजार ८०० रुपयांवर पोहोचला आहे. आज अनुक्रमे तीन हजार ३०० रुपये आणि पाच हजार रुपये इतकी वाढ झाली आहे.