

Why gold silver price increased suddenly?
esakal
Gold Silver Market Latest Update India : गेल्या तीन दिवसांत चांदीच्या दराने चांगलीच उसळी घेतली असून, त्यामध्ये १९ हजार रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याच्या दरामध्ये तीन हजार ९०० रुपयांची भर पडली आहे. चांदीचा वापर आता फक्त दागिन्यांपुरता मर्यादित राहिलेला नाही. सौरऊर्जा प्रकल्प, इलेक्ट्रिक वाहने, पॉवर ग्रिड आणि इलेक्ट्रिकल उपकरणांमुळे मागणी वाढली आहे. उत्पादन कमी आणि मागणी जास्त असल्याने चांदीच्या किमतीमध्ये वाढ होत आहे.