esakal | ऊसाच्या ‘फुले-२६५’ वाणाचा उतारा चांगला
sakal

बोलून बातमी शोधा

265

ऊसाच्या ‘फुले-२६५’ वाणाचा उतारा चांगला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर: राहुरीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या ऊस संशोधन केंद्रामार्फत ‘कोएम ०२६५’ (फुले 265) या ऊसाच्या नव्या वाणाचे संशोधन करण्यात आले असून या वाणाचा उताराही चांगला असल्याचे संशोधनातून सिध्द झाले आहे. महाराष्ट्रात २००१ मध्ये आडसाली, पूर्वहंगाम आणि सुरू या तिनही हंगामात लागवडीसाठी या वाणाची शिफारस करण्यात आली.

हेही वाचा: एफआरपी तीन तुकड्याविरोधात 'स्वाभिमानी'चे मिस्ड्‌ कॉलचे आवाहन

त्यानंतर २००९ मध्ये या वाणाची लागवड गुजरात, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र आणि तामिळनाडू या राज्यात लखनऊ येथील अखिल भारतीय ऊस संशोधन संस्थेच्या शिफारशीनंतर करण्यात आली. हा वाण ‘को- ८७०४४’ या वाणापासून निवड पध्दतीने तयार करण्यात आला. उतारा कमी असल्याचे कारण सांगत सुरुवातीला ‘फुले- २६५’ या वाणाला बऱ्याच साखर कारखान्यांनी गाळपासाठी नकार दिला होता.

पण संशोधनानंतर या वाणाचा तिन्हीही हंगामात सरासरी साखर उतारा १४.४० टक्के, तर त्या तुलनेत ‘को- ८६०३२’ मध्ये हे प्रमाण १४.४७ मिळाले. हा वाण मध्यम ते उशिरा पक्व होणारा असून थंडीचा कालावधी मिळाल्यावर डिसेंबर, जानेवारीनंतर हा वाण तोडणीस योग्य असतो. सुरु ऊस १२ महिन्यांनी, पूर्व हंगामी ऊस १४ महिन्यांनी आणि आडसाली ऊस १६ महिन्यांनी तोडणी केल्यास ‘फुले-२६५’ या वाणापासून साखर उतारा चांगला मिळतो. त्यामुळेच हे वाण शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहे.

या वाणाची खोडव्याची फुट व वाढ चांगली असल्याने एकंदर उत्पन्नही चांगले मिळते. जवळपास १३ खोडवे शेतकर्यांनी घेतल्याची उदाहरणे आहेत. या वाणावर खोड किड, कांडी किड, शेंडेकिड व लोकरी मावा या किडींचा कमी प्रमाणात प्रादुर्भाव होतो. या वाणास शासनाची परवानगी असल्याने साखर आयुक्तालयाने सर्व सहकारी आणि खाजगी साखर कारखान्यांना हा ऊस लागवडीस व गाळपास योग्य असल्याचे प्रमाणित झाले आहे. जे साखर कारखाने या वाणाच्या ऊस लागवडीची नोंद घेणार नाहित त्या कारखान्यांचा गाळप परवाना नाकारण्यात येईल असेही आदेश आहेत.

हेही वाचा: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जावळीत बॉम्ब शोधक पथकाची तपासणी

ऊस उत्पादनातील ही किमया ‘फुले-२६५’ मुळेच शक्य झाली. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील कृषि अर्थशास्त्र विभागाने या वाणाच्या प्रभावाचा अभ्यास केला. त्यामध्ये असे आढळून आले की, सन २००९-१० ते २०१६-१७ या ९ वर्षात शेतकरी आणि साखर कारखानदार यांना ३१ हजार ६८१ कोटी रूपयांचा आर्थिक फायदा झालेला आहे. - कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील

‘दत्त-शिरोळ’ च्या कार्यक्षेत्रात प्रभाव

शिरोळ येथील श्री दत्त साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात २०२०-२१ मध्ये ‘फुले-२६५’ या वाणाखाली ४० टक्के क्षेत्र होते त्यापासून सरासरी साखर उतारा १२.५४ टक्के मिळाला आहे. अलीकडच्या पाच वर्षाचे अवलोकन केले असता राज्‍यातील कारखान्याच्या कार्यक्षेत्रात या वाणाखाली ७० टक्क्यापेक्षा जास्त क्षेत्र असतानाही साखर उतारा १२ टक्क्यापेक्षा अधिक मिळाला आहे.

loading image
go to top