मृत्यूनंतरही त्या कुटुंबाची सरकारकडून परवड

government has no help from suicide victim family
government has no help from suicide victim family
Updated on

जयसिंगपूर : कर्जाला कंटाळून आत्महत्या केलेल्या शिरढोण (ता. शिरोळ) येथील तुकाराम रामू माने यांच्या कुटुंबियांना अद्याप शासनाची कवडीचीही मदत मिळाली नाही. नाम फौंडेशनने त्यांच्या मृत्युची आणि कुटुंबाच्या गरीबीची दखल घेऊन पंधरा हजाराच्या मदतीचा धनादेश दिला. मात्र, शासन पातळीवर तुकाराम माने यांच्या मृत्युनंतरही कुटुंबियांची परवड सुरुच आहे. 

महापुरात शेतातील ऊस पिकाचे नुकसान झाले. यामुळे डोक्‍यावरील कर्जाचा बोजा कमी करायचा कसा या प्रश्‍नातून 18 नोव्हेंबर 2019 रोजी त्यांनी आत्महत्या केली. मुलाचे अकाली निधन झाल्याने घरची जबाबदारी त्यांच्यावर होती. पत्नी, सून आणि दोन नातवंडाची जबाबदारी पेलविण्याची काळजी आणि त्यातच महापुराने ऊसाचे नुकसान झाल्याने हतबल झालेल्या माने यांनी मृत्युला कवटाळले. कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्यामुळे नेते आणि अधिकाऱ्यांनी घरी सांत्वनासाठी येऊन मदतीचे आश्‍वासन दिले. 

मात्र, अद्याप मदतीपासून कुटुंब वंचीत आहे. शिरोळच्या तहसिलदार अपर्णा मोरे-धुमाळ यांनी मृत माने कुटुंबियांची भेट घेऊन शासन पातळीवर मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली होती. नंतर गावकऱ्यांनीही त्यांची याप्रश्‍नी भेट घेऊन मदतीची अपेक्षा व्यक्त केली होती. प्रस्ताव पाठविला असून पाठपुरावा सुरु असल्याचे तहसिलदारांनी ग्रामस्थांना सांगितले होते. मात्र, आज साडेतीन महिने झाले तरी अद्याप शासकीय मदत माने कुटुंबियांपर्यंत पोहोचलीच नाही. नाम फौंडेशनने माने कुटुंबियांच्या परिस्थितीचा विचार करुन पंधरा हजारांची मदत देण्याचे आश्‍वासन दिले होते. 

दोन दिवसांपूर्वी नाम फौंडेशनचा पंधरा हजारांचा धनादेश माने कुटुंबियांना मिळाला. मात्र, शासनाला मात्र कुटुंबाचा विसर पडला कि काय असा सवाल ग्रामस्थांकडून व्यक्त केला जात आहे. मदतीअभावी माने कुटुंबियांची परवड सुरु आहे. घरी कर्ता पुरुष नसल्याने दोन लहान मुलांचे शिक्षण आणि उदरनिर्वाहाचा प्रश्‍न माने कुटुंबियांना भेडसावत असताना शासनाला त्यांची दया येणार का असा उव्दिग्न सवाल ग्रामस्थांमधून केला जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com