

Action against ration black marketing
esakal
Ration shop corruption news : स्वतःचे घर, चारचाकी गाडी, चार आकडी मासिक उत्पन्न असे असूनही रेशनच्या पिवळ्या किंवा केशरी कार्डचे धान्य दरमहिन्याला घ्यायचे. घरी आवश्यकता नसेल, तर अन्यत्र विकायचे. असे करणारे अनेकजण आहेत. त्यांनी स्वइच्छेने आपले रास्त भाव धान्य दुकानातील रेशन बंद करायचे आहे. मात्र, गेल्या वर्षभरात या योजनेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. श्रीमंतांना रेशन दुकानातील धान्याचा मोह सुटत नाही, हेच यावरून दिसते.