
Tricycles Disabled Stopped
esakal
तीनचाकी सायकलींमुळे दिव्यांगांच्या शरीरस्वास्थ्यावर गंभीर परिणाम, सायकलींमुळे दिव्यांग व्यक्तींची दमछाक होते
दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या विविध संघटनांकडून या सायकल बंदीची मागणी
दिव्यांगांनी शिबिरासह कार्यक्रमात मिळालेल्या सायकली जागेवरच सोडल्या, सरसकट दिव्यांगांना बॅटरीवरील सायकल द्यावी
Maharashtra Governments Decision : हाताने चालवणाऱ्या तीनचाकी सायकलींमुळे दिव्यांग व्यक्तींच्या शरीरस्वास्थ्यावर प्रतिकूल परिणाम होत आहेत. याची दखल घेत राज्य सरकारने दिव्यांगांसाठी या सायकलींचे वाटप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दिव्यांग कल्याणाच्या विविध योजनांतर्गत होणारे वाटप करू नये, असे निर्देश संबंधित घटकांना दिले आहेत. दरम्यान, सहजसोप्या पद्धतीने चालविता येणाऱ्या बॅटरीवरील सायकली दिव्यांगांना द्याव्यात, अशी मागणी दिव्यांग संघटनांकडून होत आहे.