
Kolhapur Politics : राज्य शासन कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसाठी सकारात्मक आहे. त्यासाठी कायदेशीर, तांत्रिक त्रुटी दूर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याला अधिक गती देण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज स्पष्ट केले; मात्र हद्दवाढ निवडणुकीपूर्वी की नंतर हे सांगण्याचे त्यांनी टाळले.