Kolhapur Fraud Case : तीन वर्षांपासून पसार असलेला ग्रोबझ फसवणुकीतील आरोपी अखेर जेरबंद; २६ हजार गुंतवणूकदारांच्या पैशांचा तपास वेगात
Grobz Trading Scam : तीन वर्षे ओळख लपवून राहत असलेला सोमनाथ कोळी अखेर पोलिसांच्या जाळ्यात; ग्रोबझ फसवणुकीचा तपास निर्णायक टप्प्यावर, ग्रोबझ संचालकांविरोधात कठोर कारवाई; आतापर्यंत १८ अटक, उर्वरित आरोपींचा शोध वेगात
कोल्हापूर : भरघोस परताव्याचे आमिष दाखवत फसवणूक केल्याप्रकरणी ग्रोबझ ट्रेडिंग कंपनीवर गुन्हा दाखल असून, तपास गतिमान करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील संशयित सोमनाथ मधूसुदन कोळी (वय ३६, रा. दौलतनगर) याला तीन वर्षांनंतर अटक झाली.