
GST Rate Cut
esakal
जीएसटी दर कमी – सप्टेंबरपासून सरकारने ५% व १८% असे दोन टप्पे केले; यामुळे कपडे, चप्पल, स्टेशनरी, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ, इलेक्ट्रॉनिक्स, बांधकाम साहित्य आदी वस्तू स्वस्त झाल्या.
ग्राहकांना दिलासा – दर कमी झाल्याने कोल्हापूर बाजारपेठेत उत्साह, ग्राहकांची खरेदी वाढली; व्यापाऱ्यांची उत्पादन मांडणी व माहिती देण्याची लगबग सुरू.
कडक अंमलबजावणी – जीएसटी विभागाच्या पथकांद्वारे नव्या दरांची अंमलबजावणी तपासली जात आहे; नियम न पाळल्यास कारवाई व इनपुट टॅक्स क्रेडिट रोखले जाणार.
Market Response To GST : वस्तू व सेवा कराचा (जीएसटी) दर घटल्याने कोल्हापूरच्या बाजारपेठेत उत्साह वाढल्याचे आज दिसून आले. दैनंदिन वापरातील आवश्यक असणाऱ्या वस्तू स्वस्त झाल्याने सर्वसामान्य, मध्यमवर्गीय ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. नव्या आणि कमी झालेल्या दरानुसार उत्पादनाची मांडणी, विक्री आणि त्याबाबतची ग्राहकांना माहिती देणे, अशी व्यापारी, व्यावसायिकांची लगबग वाढली आहे.