
कोल्हापुरात पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
esakal
Kolhapur Political News : अरविंद सुतार : पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि तालुक्यातील प्रमुख नेत्यांचे होम पीच असणाऱ्या गारगोटी जिल्हा परिषद मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही महिलेसाठी राखीव झाल्याने या मतदारसंघात हायहोल्टेज लढत होणार आहे. आरक्षण सोडतीत सर्वसाधारण पुरुष आरक्षण पडेल व आपल्याला संधी मिळेल, अशी अशा बाळगणारे नेते व त्यांच्या वारसदारांची आरक्षणामुळे निराशा झाली आहे. महिला आरक्षण पडल्याने नेत्यांची व त्यांच्या कुटुंबीयांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. नेत्यांच्या वारसदार महिलाच यात उतरतील, असे सध्या तरी चित्र आहे.