कोल्हापूर : ‘जिल्ह्यात मे महिन्यापासूनच पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे जिल्ह्याच्या सर्वच भागांत शेतीचे नुकसान झाले. पंचनामे करण्याचे काम गतीने सुरू असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून देण्यात येईल,’ असे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. तुकाराम माळी तालीम मंडळाच्या गणपतीची आरती केल्यानंतर त्यांनी प्रासारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.