
Karnataka Almatti Dam : आलमट्टी धरणाची उंची वाढवण्याप्रश्नी १८ जूनला दिल्ली येथे केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, तेलंगणाचे मंत्री, वरिष्ठ शासकीय अधिकारी यामध्ये सहभागी होतील. बैठकीत धरणाची उंची, महापुराच्या काळात धरणातील पाणीसाठा, आंतरराज्य पाणी करार याबाबत चर्चा होणार आहे, अशी माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सोमवारी येथे दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.