
कोल्हापूर : जिल्ह्यात तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा विक्री बंदीचा केवळ दिखावाच दिसून येतो आहे. शहरासह ग्रामीण भागात खुलेआम पानटपऱ्यांवर गुटख्याची विक्री होताना दिसते. विधानसभा आचारसंहिता काळात १.८७ कोटींचा गुटखा पकडणाऱ्या यंत्रणेची ‘दिव्यदृष्टी’ अचानकच गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.