Hasan Mushrif : राजू शेट्टींची पदयात्रा सुरु असतानाच अचानक मुश्रीफांची एन्ट्री; दोघांनी एकमेकांना हात जोडले अन्..

मंत्री मुश्रीफ यांनी गाडीतून उतरून शेट्टी यांच्याशी हस्तांदोलन आणि विचारपूस केली.
Hasan Mushrif and Raju Shetti met on Kapshi-Murgud Route
Hasan Mushrif and Raju Shetti met on Kapshi-Murgud Routeesakal
Updated on
Summary

कापशी-मुरगूड मार्गावर हळदवडे येथे त्यांची रस्त्यात भेट झाली.

सेनापती कापशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आणि आक्रोश पदयात्रेतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांची कापशी ते मुरगूड मार्गावर हळदवडे (ता. कागल) येथे भेट झाली.

मंत्र्यांनी गाडीतून उतरून त्यांच्याशी हस्तांदोलन, नमस्कार केला आणि मार्गस्थ झाले. काल (शनिवार) सायंकाळी साडेचारच्या सुमारास हळदवडे येथून मुरगूडकडे माजी खासदार शेट्टी कार्यकर्त्यांसह आक्रोश पद यात्रेतून जात होते.

Hasan Mushrif and Raju Shetti met on Kapshi-Murgud Route
Kolhapur Politics : कोल्हापूरच्या राजकारणात मोठी घडामोड, टोकाचे विरोधक आले एकत्र; तब्बल 9 वर्षांनी 'त्या' Photo ची झाली आठवण

याचवेळी काळम्मा बेलेवाडी येथील आनंदराव पाटील यांचा वाढदिवस कार्यक्रम करून मंत्री मुश्रीफ मुरगूडच्या कार्यक्रमासाठी जात होते. त्यावेळी कापशी-मुरगूड मार्गावर हळदवडे येथे त्यांची रस्त्यात भेट झाली.

Hasan Mushrif and Raju Shetti met on Kapshi-Murgud Route
Loksabha Election : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील उतरणार लोकसभेच्या आखाड्यात; कोणत्या पक्षानं दिली उमेदवारी?

मंत्री मुश्रीफ यांनी गाडीतून उतरून शेट्टी यांच्याशी हस्तांदोलन आणि विचारपूस केली. या वेळी ऊस दराच्या संदर्भात चर्चा होईल, असे अपेक्षित होते; मात्र औपचारिक भेटीनंतर मंत्री मुश्रीफ गाडीत बसून मुरगूडकडे मार्गस्थ झाले, तर शेट्टींची पदयात्रा मुरगूडच्या दिशेने निघाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com