
Kolhapur : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (केडीसीसी), जिल्हा दूध उत्पादक संघानंतर (गोकुळ) आता कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचेही नेतृत्व कागल तालुक्यात नेण्यात वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यशस्वी ठरले आहेत. गोकुळ अध्यक्ष निवडीमध्ये राज्य पातळीवरील हस्तक्षेपानंतर डावलेलेल्या सतेज पाटील यांच्या पदाधिकाऱ्यांना बाजार समितीचे नेतृत्व ठरविण्यात प्राधान्य दिले जाईल, असे चित्र होते. मात्र, यातही मुश्रीफ यांनी बाजी मारून जिल्ह्यातील राजकारणात त्यांच्यापुढे इतर नेते हतबल असल्याचे दाखवून दिले.