Hasan Mushrif Gokul Milk Union election announcement
esakal
कागल : मी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी उभा राहणार नाही, अशी स्पष्टोक्ती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी येथे दिली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जनसेवा सप्ताह अंतर्गत झालेल्या कागल विधानसभा मतदारसंघातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना किट वाटप, शिष्यवृत्ती मंजुरी पत्रे वाटप, घरकुल पत्रे वाटप या संयुक्त कार्यक्रमात मंत्री मुश्रीफ बोलत होते. यावेळी शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांची प्रमुख उपस्थिती (Hasan Mushrif not contesting Gokul election) होती.