
Hasan Mushrif
esakal
महायुतीत एकत्रित लढण्याचा सल्ला – कोल्हापूर महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये महायुतीने एकत्र राहिल्यासच यश मिळेल; जागा वाटपावर अनावश्यक वक्तव्ये करून वाद नको, असा सल्ला वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला.
पूरग्रस्तांसाठी मदत – राज्यातील अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांतील पूरग्रस्तांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ५१ लाखांची मदत; पहिल्या टप्प्यात २५ लाखांचे अन्नधान्य, उर्वरितातून चारा, भांडी, कपडे आदी देण्यात येणार.
आगामी निवडणुकीत ‘डाव’ – ‘आमचे वस्ताद मंत्री मुश्रीफ यांनी ताकदीचा डाव राखून ठेवला असून, आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीला सोबत घेतल्याशिवाय इतरांना पर्याय राहणार नाही,’ असा इशारा भैया माने यांनी दिला.
Kolhapur Politics : कोल्हापूर ‘जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीत काय होईल, याबाबत मला सांगता येत नाही. मात्र, एकत्रित लढलो तरच, कोल्हापूर महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार आहे. त्यामुळे जागा वाटपाबाबत उगाच अनावश्यक वक्तव्ये करून एकमेकांत वाद निर्माण होऊन जनतेत चुकीचा संदेश जायला नको. त्याबाबतची दक्षता घेऊया’, असा सल्ला वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांना दिला.