
Hasan Mushrif
esakal
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधकांवर आपत्तीच्या काळातही राजकारण केल्याचा आरोप करत, पंचनामे पूर्ण झाल्यावरच मदत देणे सोपे होते असे स्पष्ट केले.
राष्ट्रवादीकडून पूरग्रस्त भागांसाठी १२ ट्रकमधून जीवनावश्यक साहित्य पाठवण्यात आले असून, सोलापूरसाठी आणखी २५ ट्रक मदत जाणार आहे; तसेच ‘गोकुळ’ला पशुखाद्य पाठवण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत.
स्थानिक स्वराज्य निवडणुकीबाबत महायुती म्हणून शक्य तिथे निवडणुका लढवणार असून, मैत्रिपूर्ण लढतीत एकमेकांवर टीका न करण्याचे ठरले आहे.
Hasan Mushrif Questions Uddhav Thackeray : ‘राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी काम केले आहे. एक-दोन दिवसांत पंचनामे अशक्य आहेत. पंचनामे पूर्ण होऊन नुकसानीचा निश्चित आकडा कळला तर मदत करणे सोपे जाते. हेच जर त्यांना कळत नसेल तर ते विरोधासाठी विरोध करत आहेत. या आपत्तीच्या काळातही विरोधक राजकारण करत आहेत, हे बरोबर नाही’, अशी टीका वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.