

Hasan Mushrif Sanjay Raut
esakal
NCP MLA Defection News : राष्ट्रवादी काँग्रेसचे २० ते २२ आमदार फुटणार असल्याच्या संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या वक्तव्यावर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार एकसंघ आहेत. कोणीही कुठेही जाणार नाही. आमदारांचा दुसरा गट होण्याची शक्यताच नाही,’ असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, संजय राऊत यांनी आपल्या पक्षातील घडामोडींवर बोलण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाक खुपसू नये, असा टोलाही त्यांनी लगावला. महायुतीतील घटक पक्षांवर शिवसेनेच्या नेत्यांकडून होत असलेल्या टीकेबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.