

हसन मुश्रीफांनी समरजितसिंहांसोबतची युती कोणामुळे झाली हे उघड करत संजय मंडलिकांवर कडवा हल्ला चढवला.
esakal
Kolhapur Politics : ‘दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे काम किती मोठे आहे. ते कुठे आणि प्रा. संजय मंडलिक कुठे. त्यांच्यावर मी काय व्यक्तिगत टीका करणार नाही. मात्र, त्यांनी आपले तोंड आवरावे. सांभाळून बोलावे. मी जर प्रा. मंडलिक यांच्यावर बोलायला गेलो, तर ‘बात दूर दूर तक जायेगी’, असा थेट इशारा वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे दिला.