सुळकूड पाणी योजनेला आता 'या' गावांचा विरोध; मुश्रीफांसह कृती समितीनं घेतली CM शिंदेंची भेट, तोडगा निघणार?

योजनेची माहिती घेऊन कोणावरही अन्याय होणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिष्टमंडळाला दिली.
Sulkud Water Scheme Eknath Shinde
Sulkud Water Scheme Eknath Shindeesakal
Updated on: 
Summary

काळम्मावाडी धरणाच्या गळतीला ताबडतोब भरीव निधी उपलब्ध करून द्यावा.

कोल्हापूर : इचलकरंजी (Ichalkaranji) शहरास सध्या उपलब्ध पाणीसाठा, पाण्याचे स्त्रोत व पाण्याची गरज यातून सर्वेक्षण करावे. इचलकरंजी शहरास पाणी कमी पडणार असेल, तर कृष्णा किंवा वारणा नदीतून उपलब्ध होऊ शकते.

त्याचबरोबर पंचगंगा प्रदूषणाबाबत कोल्हापूर महानगरपालिकेने सविस्तर अहवाल शासनास सादर करून त्याचा पाठपुरावा महापालिकेने करावा. सुळकूडमधील (Sulkud Water Scheme) दूधगंगा नदीमधून इचलकरंजीला पाणी देऊ नये, अशी आग्रही मागणी दूधगंगा बचाव कृती समितीच्या वतीने सर्वपक्षीय नेत्यांनी केली आहे.

Sulkud Water Scheme Eknath Shinde
Bedag : बाबासाहेबांच्या नावाची कमान पाडणाऱ्या गावात मोठा ठराव; विरोधात निकाल जाताच ग्रामसभेतून आंबेडकरी समाज पडला बाहेर

वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif), खासदार संजय मंडलिक, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, जिल्हा शिवसेनाप्रमुख राजेखान जमादार यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडं ही मागणी केली.

Sulkud Water Scheme Eknath Shinde
Loksabha Election : लोकसभा निवडणुकीपूर्वीच मोठ्या हालचाली; काँग्रेस-भाजपात गेलेले 'हे' बडे नेते पुन्हा पक्षात परतणार?

यावेळी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेवेळी काळम्मावाडी धरणाच्या गळतीला ताबडतोब भरीव निधी उपलब्ध करून द्यावा व सुळकूड पाणी योजनेस दूधगंगा काठावरील राधानगरी, भुदरगड, कागल, करवीर, शिरोळ, चिक्कोडी, निपाणी येथील लोकप्रतिनिधी व नागरिक यांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन योजना रद्द करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. दरम्यान, या योजनेची माहिती घेऊन कोणावरही अन्याय होणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिष्टमंडळाला दिली.

Sulkud Water Scheme Eknath Shinde
Hasan Mushrif : 'तो शब्द अनावधानानं माझ्या तोंडून गेला'; असा कोणता शब्द होता, ज्यामुळं मुश्रीफांना घ्यावा लागला यूटर्न

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Hasan Mushrif Satej Patil Gokul election Kolhapur
Satej Patil on Hasan Mushrif Gokul Election
Hasan Mushrif panel announcement October 8
Gokul Election 2026 Latest Update
Marathi News Esakal
www.esakal.com