
Ladaki Bahin Yojana Hasan Mushrif : वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. मुश्रीफांनी नुकत्याच एका कार्यक्रमात जनतेशी संवाद साधताना मनमोकळ्या भाषेत भावना व्यक्त केल्या. त्यांनी आपल्या भाषणात निवडणुकीतील अनुभव, जनतेचा प्रतिसाद, तसेच भविष्यातील आश्वासने याबाबत स्पष्ट भूमिका मांडली. यावर त्यांनी लाडकी बहीण योजना आणि विश्वकर्मा योजनेत मिळालेल्या लाभाविषयी केलेल्या वक्तव्याने चर्चेत आले आहेत.