जनता दलामुळे गडहिंग्लजचे वाटोळे, हसन मुश्रीफांचा घाणाघात; कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिणेत राजकारण तापणार
esakal
कोल्हापूर
Hasan Mushrif : जनता दलामुळे गडहिंग्लजचे वाटोळे, हसन मुश्रीफांचा घाणाघात; कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिणेत राजकारण तापणार
Kolhapur Gadhinglaj : हसन मुश्रीफ यांनी जनता दलावर टीकास्त्र सोडत गडहिंग्लजचे वाटोळे केल्याचा आरोप केला. दक्षिण कोल्हापूरच्या राजकारणात नवीन समीकरणे तयार होण्याचे संकेत.
Hasan Mushrif Slams Janata Dal : ‘गडहिंग्लज शहराची अनेक वर्षे सत्ता भोगणाऱ्या जनता दलाच्या हातात आहेच काय? त्यांच्यामुळेच शहराचे वाटोळे झाले आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत इकडे तिकडे बघू नका. शहराचा स्वर्ग करायचा असेल, विकासाचे सर्व प्रश्न सोडवायचे असतील, तर गडहिंग्लजची सत्ता महायुतीच्या हातात द्या’, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे (अजित पवार गट) गडहिंग्लज शहरातील घरकुल लाभार्थ्यांचा मेळावा आणि बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच वाटपाचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी मुश्रीफ बोलत होते. जडेयसिद्धेश्वर आश्रमात हा कार्यक्रम झाला.

