
कोल्हापूर: ‘एखाद्या मुद्द्यावर सीपीआरविरोधात आक्रमक होणाऱ्या संस्था- संघटनांनी किमान दोन वर्षे शांत राहावे. कारण सीपीआर रुग्णालयासह शेंडापार्क येथे ११०० बेडचे अत्याधुनिक सुविधा असलेले रुग्णालय उभारले जात आहे. त्यामुळे दोन वर्षांनंतर कोल्हापुरातील कोणत्याही रुग्णाला उपचारासाठी बाहेरच्या शहरात जाण्याची गरज भासणार नाही. अशा चांगल्या सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी आम्हाला संधी द्यावी व त्यासाठी शांत राहावे,’ असे आवाहन वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.