
Haathi Mera Saathi Elephant : संदीप खांडेकर : ‘क्या कर रही मॉं? क्या हुआ? एैसे बोल के मैं महादेवी की तकलीफ महसूस करता. अब उसकी याद कर के रोना आता. वो जाने के बाद जिंदगी खट्ट हो गया. वो उधर गयी, लेकीन मेरा कुछ अपना गुम गया एैसा लगता,’ नांदणीतील ‘महादेवी हत्तीणी’चे माहुत इस्माईल महात सांगत असताना त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंची धार थांबत नव्हती. खांद्यावरच्या रुमालाने डोळे पुसत ‘उसको याद कर के दिल को तकलीफ होता,’ असे बोलून ते पुन्हा सुन्न झाले. ‘महादेवी’च्या आठवणींचे पदर उलगडताना चाचांना ती सुखरुप पोहोचली असेल का, याचीच रुखरुख लागली होती.