

तब्बल ३ महिन्यांनी माधुरी हत्तीणीने तिचा माहुत इस्माईल चाचाला पाहताच भावनिक प्रतिक्रिया दिली.
esakal
Madhuri Elephant Ismail Chacha : माधुरी हत्तीण आणि माहुत इस्माईल चाचा यांची गुजरात येथील वनतारामध्ये तब्बल ३ महिन्यांनी भेट झाली. या भेटीत माहुत इस्माईल चाचा आणि माधुरीचे डोळे पाणावले. प्रेम, ओळख आणि नात्याचा हा स्पर्श शब्दांच्या पलीकडचा होता. तीन महिन्यांहून अधिक काळानंतर माधुरी हत्तीण आपल्या ‘चाचांना’ भेटली आणि त्यांना पाहताच तीने प्रेमाने सोंड पुढे केली. इस्माईल चाचांनी हाक मारताच माधुरीसह इस्माईल चाचांचे पाणावलेले डोळे पाहून सगळेच थक्क झाले.