
Kolhapur Heavy Rain Warning : कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी बंधाऱ्यांमध्ये असणारे लाकडी बरगे काढण्याचे काम सुरू आहे, तर राधानगरी धरणाच्या स्वयंचलित दरवाजांचीही डागडुजी केली जात आहे.
अवकाळी, वळीव तसेच मॉन्सूनपूर्व झालेल्या दमदार पावसाने जिल्ह्यातील पाणीसाठा गेल्यावर्षीच्या तुलनेत दुपटीने शिल्लक राहिला आहे. राधानगरी धरणात गेल्यावर्षी १३ जून २०२४ रोजी एकूण पाणीसाठ्याच्या २४ टक्के पाणीसाठा होता आज तो ५२.७० टक्के शिल्लक राहिला आहे. हीच परिस्थिती इतर धरणांची व लघु पाटबंधाऱ्यांची आहे.