
Sugarcane Crisis
esakal
हंगाम उशिरा सुरू होणार – अतिवृष्टीमुळे ऊस पिकांचे नुकसान आणि कर्नाटकचा लवकर हंगाम यामुळे कोल्हापूरसह राज्यातील साखर हंगाम उशिरा सुरू होण्याची शक्यता आहे.
उसाची पळवापळवी – कर्नाटकात कारखाने महाराष्ट्रापेक्षा लवकर सुरू होत असल्याने सीमाभागातून उसाची पळवापळवी होत असून महाराष्ट्रातील कारखान्यांवर ताण आहे.
बैठकीत निर्णय अपेक्षित – मंत्री समितीची बैठक मंगळवारी (ता. ३०) होणार असून, त्यात हंगामाची तारीख आणि ऊस उपलब्धतेचे अंतिम चित्र स्पष्ट होईल.
Sugarcane Season Maharashtra : राज्यात मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली अतिवृष्टी आणि कर्नाटकच्या लवकर सुरू होणाऱ्या हंगामामुळे यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील साखर हंगामावरही ‘आपत्ती’ येण्याची शक्यता आहे. परिणामी, हंगाम उशिरा सुरू करावा लागणार आहे. याचा निर्णय मंगळवारी (ता. ३०) मुंबईत होणाऱ्या मंत्री समितीच्या बैठकीत होईल.