

जयसिंगपूर नगरपरिषदेच्या सभागृहात माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे बंधु नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर आणि माजी खासदार राजू शेट्टी यांचे स्विय्य सहायक स्वस्तिक पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.
esakal
High Voltage Political Clash Jaysingpur : (गणेश शिंदे) : कोल्हापूर जिल्ह्यात नगरपरिषदेच्या निवडणुकांमध्ये हळूहळू रंगत चढायला सुरू झाली आहे. काल(ता.१८) जिल्ह्यातील नगरपरिषदांचा अर्ज छाननीचा दिवस हाय व्होल्टेज ड्राम्याने झाला. जिल्ह्यातील जयसिंगपूर नगरपरिषदेच्या सभागृहात माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे बंधु नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर आणि माजी खासदार राजू शेट्टी यांचे स्विय्य सहायक स्वस्तिक पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. राजर्षी शाहू आघाडीने शिरोळ तालुका विकास आघाडीवर केलेल्या आरोपावरून जोरदार वाद झाल्याने शिरोळ तालुक्यात चर्चांना उधाण आले. दरम्यान, या घटनेत दोन्ही गटांकडून थेट मंत्र्यांना फोनाफोनी करून दबावतंत्राचा वापर केल्याचीही जोरदार चर्चा रंगली आहे.