
-युवराज पाटील
शिरोली पुलाची : राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात समाविष्ट करण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज असूनही अद्याप स्वतंत्र निवासी महाविद्यालयाची स्थापना झालेली नाही. दिव्यांगांमधील सुप्त कौशल्यांना चालना देण्यासाठी त्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा पुरवणे गरजेचे असताना, शासनाकडून याकडे दुर्लक्ष होत आहे.