

Kolhapur MLA Honeytrap Attempt Accused Arrested for Demanding Rs 10 Lakh from Shivaji Patil
Esakal
कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील यांना महिलेच्या नावे अश्लील मेसेज आणि व्हिडीओ पाठवून हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. आता या प्रकरणी एका २५ वर्षीय तरुणाला चंदगड पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आरोपी हा चंदगडमधीलच रहिवासी असल्याचं समोर आलंय. गेल्या वर्षभरापासून आरोपी आमदार शिवाजी पाटील यांना अश्लील फोटो, व्हिडीओ पाठवून पैशांची मागणी करत होता.