

College Students And Farmhouses Linked To Hydroponic Cannabis Supply Through Social Media Chats And Hidden Delivery Networks
sakal
-गौरव डोंगरे
कोल्हापूर: पारंपरिक नशेची साधने मागे पडून आता कोल्हापुरात महागड्या रासायनिक ड्रग्जची क्रेझ वाढल्याचे दिसून येत आहे. शाळा-कॉलेज परिसरातील छुप्या पेडलर्सचे जाळे तयार होत असून, कॉलेज कट्ट्यावर ‘ड्रग्ज’ मिळू लागल्याने चिंता वाढली आहे. उच्च शिक्षणाच्या निमित्ताने शहरात राहणाऱ्या एकाकडून हायड्रोपोनिक गांजा राजारामपुरी पोलिसांनी जप्त केला, तर सुटीदिवशी एखादे ‘फार्महाऊस’ बुकिंग करून नशेच्या पार्ट्या करण्याचेही फॅड रुजू लागले आहे. जागेवर ‘माल’ पोहोचविणारी यंत्रणा मोडून काढण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.