esakal | गल्लीतील धमक्यांना मी घाबरत नाही- समरजितसिंह घाटगे
sakal

बोलून बातमी शोधा

samarjeet sing

गल्लीतील धमक्यांना मी घाबरत नाही- समरजितसिंह घाटगे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर: स्वतःवर झालेल्या आरोपांना राजकीय वळण देण्यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी माझे आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे नाव घेतले आहे. त्यांच्या राजकारणाचा तो एक भाग आहे. राजकारणाचे असले संस्कार आमचे नाहीत. पैरा फेडण्याच्या धमक्या देऊ नयेत. मी राजर्षी शाहू महाराजांच्या रक्ताचा वारस आहे. अशा गल्लीतील धमक्यांना घाबरत नाही. असे प्रत्युत्तर भाजप जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी मुश्रीफांना दिले. याबाबतचे निवेदन त्यांनी सोशल मिडीयावर प्रसिद्ध केले आहे.

हेही वाचा: कोयना धरणातून 50,000 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू

निवेदनात म्हटल्यानुसार, माजी खासदार किरीट सोमय्या यांना मी कधीच भेटलो नाही. त्यांनी हसन मुश्रीफांवर आरोप केले हे मला प्रसारमाध्यमातूनच कळले. त्यामुळे सोमय्या यांना पुरावे देण्याचा संबंधच नाही. पण या संदर्भात मुश्रीफ यांनी पत्रकार परीषदेत माझे नाव घेतल्याचे माध्यमातून कळाले. म्हणून मी स्पष्टीकरण देत आहे.

माझे आणि चंद्रकांत पाटील यांचे नाव घेऊन स्वतःवरील आरोपांना राजकीय वळण देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या प्रकरणाचा आणि माझा काडीचाही संबंध नाही. पत्रकार परिषदेत ते पैरा फेडू असे म्हणाले. मी राजर्षी शाहू महराजांच्या रक्ताचा वारस आहे. राजे विक्रमसिंब घाटगे यांचा चिंरजीव आहे.

अशा गल्लीतल्या धमक्यांना मी घाबरत नाही. घाबरत असतो तर त्यांच्या विरोधात अपक्ष म्हणून विधानसभेला उभा राहीलो नसतो. जनता माझ्या सोबत होती म्हणूनच ९० हजार मते घेतली. याबाबत सुद्धा जनताच उत्तर देईल. हसन मुश्रीफ उठसूट मोदी आणि शहांवर टीका करत असतात. पण मी मात्र त्यांच्यावर कधी टिका केली नाही. मात्र त्यांना माझे नाव घ्यावे लागले यावरूनच त्यांचे माझ्यावर किती प्रेम आहे हेच दिसून येते.

ही ठरलेली वाक्ये...

मानहानीचा दाव करणार आणि हत्तीवरून मिरवणूक काढणार ही मुश्रीफांची ठरलेली विधाने आहेत. त्यांच्या मानहानीच्या दाव्यांसाठी स्वतंत्र खंडपीठ काढावे लागेल. असे घाटगे यांनी निवेदनात म्हटले आहे.

loading image
go to top