
Ichalkaranji Crime
esakal
कुत्रे भुंकण्यावरून चाकू हल्ला – हातकणंगले तालुक्यातील खोतवडी (अयोध्यानगर) येथे कुत्रे भुंकल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून माय-लेकाने शेजारील बाप-लेकावर चाकू हल्ला करून दोघांना गंभीर जखमी केले.
जखमी व आरोपी – अक्षय भरमा गौरोजी (३०) व त्यांचे वडील भरमा गौरोजी गंभीर जखमी; आरोपी श्रेयस योगेश जोशी (२१), त्याची आई मंजिरी जोशी (४१) व श्रेयसचे काही मित्रांविरुद्ध शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; दोन मुख्य संशयित ताब्यात.
घटनेत चिथावणी व भीतीचे वातावरण – मंजिरी जोशी यांनी चिथावणी देताच श्रेयसने चाकूने वार केला, वडील थांबवायला गेले तेव्हा त्यांच्यावरही हल्ला; या घटनेने परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले.
Ichalkaranji Bargad Knife Attack : कुत्रे भुंकल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून माय-लेकाने शेजारील बाप-लेकावर चाकू हल्ला करत गंभीर जखमी केले. या हल्ल्यात अक्षय भरमा गौरोजी (वय ३०), भरमा गौरोजी (दोघे रा. अयोध्यानगर, गल्ली क्र. ६, खोतवाडी) हे दोघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी श्रेयस योगेश जोशी (२१) व मंजिरी योगेश जोशी (४१, दोघे रा. अयोध्यानगर, खोतवडी) यांच्यासह श्रेयसच्या काही मित्रांवर शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यातील दोन मुख्य संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.